• खाडगाव ,ता. लातूर ,जिल्हा. लातूर ४१३५१२


प्रवेश माहिती

प्रवेश प्रक्रिया आणि काही महत्त्वाच्या नियमांविषयी सविस्तर -


व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रातील किमान 30 दिवसांचे वास्तव्य अपेक्षित आहे.

जर दाखल केलेल्या रुग्णालय इतर आजारावर बाहेरील हॉस्पिटल मधील काही वैद्यकीय सेवा लागल्यास त्याचा खर्च स्वतंत्ररित्या करावा लागेल.

प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे सर्व अधिकार जीवन रेखा प्रतिष्ठानने स्वतःजवळ राखून ठेवलेले आहेत.

रुग्ण अल्कोहोल विथड्रॉल स्थितीमध्ये असल्यास रुग्ण या स्थितीमधून बाहेर पडेपर्यंत रुग्णासोबत नातेवाईकांनी राहणे बंधनकारक नाही. गरज पडल्यास नातेवाईकांना बोलवल्यास वेळेवर येणे बंधनकारक राहील.

प्रवेश घेतेवेळी रुग्णाचे आधार कार्ड देणे बंधनकारक राहील.


नातेवाईकांसाठी महत्त्वाच्या सूचना -


रुग्णमित्रास भेटण्यासाठी नातेवाईकांनी पुढील वेळेत यावे.
आपल्या सर्वांनाच रुग्ण मित्रांची काळजी आहे, परंतु काळजीपोटी नातेवाईकांची जास्त गर्दी झाल्यास रुग्णमित्रास त्रास होऊ शकतो. म्हणून एका वेळी फक्त दोनच नातेवाईक रुग्णमित्रास भेटू शकतात.

आमची संस्था संपूर्णपणे व्यसनमुक्तीसाठी काम करत असल्यामुळे नातेवाईक व्यसन करून आल्यास (तोंडात तंबाखू असल्यास, दारु पिऊन आल्यास) त्यांना आत प्रवेश मिळणार नाही. आपल्या जवळ तंबाखूजन्य पदार्थ असल्यास ते बाहेरील बॉक्समध्ये टाकावेत व त्यानंतरच नातेवाईकांना आज प्रवेश देण्यात येईल.

आपला रुग्णमित्र मानसिक त्रासात असल्यामुळे कदाचित तो अस्वछ राहू शकतो तसेच संस्थेच्या आतील परिसर अस्वच्छ करू शकतो. तरी आपण नातेवाईकांनी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा.

रविवार हा संस्थेच्या आठवडे आठवड्याच्या सुटीचा दिवस असल्यामुळे रविवारी रुग्ण मित्राला डिस्चार्ज देण्यात येणार नाही तसेच इतर दिवशी संध्याकाळी सहा नंतर रुग्णमित्र डिस्चार्ज करण्यात येणार नाही.

आपल्या रुग्ण मित्राचे व्यसन सोडविण्यासाठी कुटुंबीयांचा शंभर टक्के सहभाग सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णमित्र दाखल झाल्यावर रुग्णाला सोबत राहता येणार नाही. त्यानंतरच्या दिवसांमध्ये दर दिवशी किमान एकदा तरी नातेवाइकांनी समुपदेशकाशी संवाद साधण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राच्या नंबर वर फोन करणे गरजेचे राहील.

रुग्णमित्राच्या नातेवाईकांनी दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 2 या वेळेत कौटुंबिक चर्चासत्रासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील.

महत्वाची सूचना

आंतररुग्ण मित्रास खालील वस्तू देण्यास सक्त मनाई आहे

  • अंमलीपदार्थ
  • पैसे
  • मांसाहारी पदार्थ
  • आफ्टर शेव लोशन
  • शहाळे
  • तंबाखूजन्य पदार्थ
  • मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर विजेवर चालणाऱ्या वस्तू
  • ब्लेड, कात्री, सुरी व इतर हत्यार
  • बाहेरील औषधे
  • भाजकी सुपारी / सुगंधी सुपारी
  • मौल्यवान वस्तू
  • बॉडी स्प्रे
  • बाम, आयोडेक्स
  • थंडपेय
  • इत्यादी